न्यूज़ वाणी
जागतिक आरोग्य दिवस – प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आध्यात्मिक उपाय–
ब्यूरो मुन्ना बक्श
मराठी। ७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या प्रभावाशी झुंज देत आहे, अशा परिस्थितीत या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. १९४८ साली या दिवशी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना झाली.
या काळात लोक बाह्य गतिविधींमध्ये सहभाग घेऊ इच्छित नसल्याने, घरी राहून ऑनलाइन ध्यानाचा अभ्यास शिकण्याचा ट्रेंड वाढला आहे. आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या साधना पद्धतीबद्दल सांगणार आहोत जी कोरोनाच्या काळात ऑनलाइन वेबिनारद्वारे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात प्रभावी आहे.
आम्ही तुम्हाला फालुन दाफा (किंवा फालुन गॉन्ग) ची ओळख करून देऊ इच्छितो, जी मनाची आणि शरीराची उच्च-स्तरीय साधना आहे. फालुन दाफामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकवले जातात, परंतु मनाची साधना किंवा नैतिक गुणांच्या विकासावार भर दिला जातो.
हे व्यायाम साधकाच्या ऊर्जा वाहिन्या उघडण्यास, शरीर शुद्ध करण्यास, तणावमुक्त करण्यास आणि आंतरिक शांती प्रदान करण्यास मदत करतात. मन आणि शरीराची एक परिपूर्ण साधना असल्याने, लोकांना कमी कालावधीत आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायदे मिळतात.
या साधनेमुळे अनेकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे जसे की चांगली झोप येणे, कमी ताण, वाढलेली ऊर्जा, चिडचिड कमी होणे, पाचन सुधारणे इ. कॅन्सर, मधुमेह, हिपॅटायटीस, हृदयविकार यांसारख्या आजारांमध्ये अनेकांना फायदा झाला आहे. अनेक लोक नोंदवतात की या साधनेमुळे त्यांची धूम्रपान करण्याची इच्छा कमी झाली आहे आणि ते तंबाखू आणि इतर व्यसन सोडण्यास सक्षम आहेत.
फालुन गोंग अभ्यास आज जगभरात लोकप्रिय आहे, पण खेदाची गोष्ट म्हणजे फालुन दाफाची जन्मभूमी असलेल्या चीनमध्येच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १९९९ पासून फालुन दाफा अभ्यासावर दडपशाही सुरु आहे. फालुन दाफाला प्रथम , मे १९९२ मध्ये श्री ली होंगझी यांनी चीनमध्ये सार्वजनिक केले होते. आज ही साधना १०० पेक्षा जास्त देशांमध्ये १०० कोटी लोकांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातही सर्व प्रमुख शहरांमध्ये याचा सराव केला जातो.
मुंबईतील फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेकजण फालुन दाफाचा सराव करत आहेत. त्यांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना या साधनेमुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती हे ध्येय गाठता आले आहे. देशभरातील अनेक शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पोलीस अकादमी आणि तुरुंगांमध्येही फालुन दाफा शिकविल्या गेला आहे.
फालुन दाफा पूर्णपणे नि:शुल्क शिकविल्या जातो. तुम्हालाही हा साधना अभ्यास शिकण्यात रस असेल, तर तुम्ही www.learnfalungong.in वर मोफत वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. Falun Dafa बद्दल अधिक माहिती तुम्ही www.falundafaindia.org वर मिळवू शकता।